गोष्ट अँड्रॉईड ची… : भाग एक 

विषयाचे नाव वाचून तुम्हाला समजले असेलच की मी आज कश्याबद्दल बोलणार आहे. आजकाल अंड्रॉईड मोबाईल खुपच लोकप्रिय आहेत, आज प्रत्येकाकडे अँड्रॉईड फोन दिसतो. पण तुम्हाला माहीत आहे काॽ की ही ऑपरेटिंग सिस्टीम एवढी लोकप्रिय कशी झाली,हीला कोणी बनवलं,पहीला अँड्रॉईड कोणता,इ. तर चला हेच जाणून घेऊयात.
२००० च्या दशकाच्या मध्यात स्मार्टफोन हे खुप फास्ट आणि युझर फ्रेंडली नव्हते,devlopers वर अनेक बंधने होती आजच्या सारखे कोणीही applicatons डेवलप करु शकत नव्हते आणि oprating system मध्ये BlackBerry, palm os, symbian आणि windows os चा दबदबा होता.
ॲंड्रॉइड येण्या पुर्वी एक छोटीशी कंपनी होती तीचे नाव होते danger या कंपनी ची स्थापना केली होती पुर्व APPLE MANUFACTURE ENGENEER ॲंडी रुबिन याने, जो पुढे जाऊन ॲंड्रॉइड ओएस तयार करणार होता.


ॲंडी  रुबिन बद्दल:

ॲंडी रुबिन म्हणजेच ॲंड्रू एन. रुबिन (जन्म १९६३) 

हे अमेरिकेतील एक computer programmer आहेत. तसेच ते playground global,redpoint venchers कंपनीचे भागीदार आहेत व danger,android inc. चे सह संस्थापक आहेत.

 गूगल ने android ला खरेदी केल्यावर ते गूगलचे सिनियर वाइस प्रेसिडेंट होते नंतर त्यांची जगा सुंदर पिचइ यांनी घेतली.
पण त्याच्या danger कंपनीला प्रसिद्धी मिळाली ती त्याच्या hiptop नवाच्या smartphone मुळे ,कारण त्याला landscape keybord होते आणि असे software होते की ज्यामुळे messeging, web browsing,आणि email अगदी फास्ट ॲक्सेस केले जाऊ शकत होते. 

 danger चे सक्सेस पाहून T mobile ने त्यांच्याची partnership केली आणि hiptop चे नाव sidekick ठेवण्यात आले.

त्यच्या या functions मुळे sidekick ने blackberry, microsoft यां सारख्या कंपन्यां मधे आपले एक वेगळे स्थान निर्माण केले .

त्या नंतर ॲंडी रुबिन याने नवीन कंपनी ची स्थापना केली जी फक्त software design वरच फोकस करनार होती. 

जीचे नाव होते android incorporation.

Android inc. ही एक अशी software company होती की जीने २ वर्षे कोंतेही product वीकले नव्हते. या कळात ॲंडी रुबिन स्वत आपल्या खिशातल्या पैश्यातून ही कंपनी चालवत होता. तो आपल्या छोट्याश्या software engineer च्या टिम बरोबर भविष्यातले smartphone बनवन्याच्या योजना आखत होता. 

या काळातच apple च्या iphone बद्दलच्या अफवा उडत होत्या.

गूगल हळूहळू जानमाणसांत प्रसिद्ध होत होता आणि त्याला आता blackberry आणि microsoft ला टक्कर देण्यासाठी एका स्मार्टफोन कंपनीची गरज होती.

लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन ला प्रतेक मोबाईल मध्ये default गूगल सर्च इंजिन हवे होते आणि android हे स्वप्न साकार करण्यासाठी गूगल ची मदत करण्यात सक्षम होता.

आणि google ने android ला ५०दशलक्ष dollors ला २००५ साली विकत घेतले, ॲंडी रुबिन ची स्वप्न पूर्ण करण्यास गूगल हे चांगले माध्यम होते.गूगलने android चा विकास करण्यास सुरुवात केली.

त्यानीं android नावाचे सोफ्टवेर तयार केले जे मुक्त स्त्रोत परवान्या सोबत उपलब्ध होणार होते ज्या मुळे कोणीही android सोफ्टवेरमध्ये बदलकरु शकतहोते आणि कोणीही android साठी app devlop करु शकतात.
तुम्हाला महित असेलच की, T mobile चा G1 मोबाइल हा पहिलावहिला android phone होता. ज्या मध्ये qwerty keypad होते ,slider design आणि touch स्क्रीन होता.

 गूगल च्या प्रयोगशाळेत काही prototypes वर काम चालू होते ते त्यांच्या मोबाइल पार्टनर HTC सोबत.त्यातील sooner नावाचा prototype मोबाइल रीलीजसाठी तयार झाला परंतु त्याचवेळी apple ने आपला पहिला iphone बाजारात आणला, पहिल्याच लॉंच नंतर iphone खुपच प्रसिद्ध झाला. त्यामुळे गूगलने sooner लॉंच केला नाही कारण sooner हा एक blackberry सारखा मोबाईल होता ज्याला physical keybord होते आणि तो touchscreen ही नव्हता म्हणूनच त्यांना iphone पेक्षाही चांगला phone रीलीज करायचा होता. शेवटी जवळजवळ वर्षभरा नंतर २३ सेप्टेंबर २००८ साली गूगलने htc dream one हा मोबाइल लॉंच केला(अमेरिकेत हा मोबाईल T mobile G1 या नावाने ओळखला जाई). याची फीचर्स पाहुन तुम्हाला कदाचित हसु येइल, htc dream one मध्ये

 528mhz quallcomm msm 7201A सिंगल कोर प्रोसेसर होता,

192mb ram,

Physical qwerty keybord,

256 mb rom,

3.15 mp camera,

1150mAh battrey,

3.2 inch चा मोठा display(त्या वेळचा) होता आणि मुख्य म्हणजे तो android ओएस 1.6 (donut) वर चालत होता. एवढे specs त्यावेळी android run करायला पुरे होते.या मोबाईलने त्यावेळच्या blackberry, ios,symbian आणि windows साठी कडक आव्हान निर्माण केले.

२००८ पासून गूगलने अपडेट द्यायला सुरुवात केली. त्यांचा प्रत्येक अपडेट हा alphabetic order नुसार असतो. त्या अपडेटचे नाव एका गोड पदर्था वर ठेवले जाते.

जसे:- 

१)alpha

2)beta

3)Cupcake

4)donut

5)eclairs

6)Froyo

7)Gingerbread

8)Honeycomb

9)ice-cream sandwich

10)jelly bean

11)Kitkat

12)Lolipop

13)Marshmellow

14)Nought

15)……
आता पाहूयात “z” अक्षरावर गेल्यानंतर कोणत्या नावाने अपडेट देतायत ते.

htc aka Tmobile तर फक्त सुरुवात होती,लोकांना android मधील drag drop notifications,multitasking ई. हळूहळू आवडत होते. Android चे पुढे काय झाले हे पाहू पुढील भागात……

तो पर्यंत नमस्कार.
आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा.. धन्यवाद!!

Advertisements